Murder in Nagpur | गृहमंत्र्यांचं नागपूर पुन्हा हादरलं! गुंड शैलेश देशभ्रतारची दगडाने ठेचून हत्या
गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नागपूर पुन्हा एका गुन्ह्यामुळे हादरलं आहे. गुंड शैलेश देशभ्रतारची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. गेल्या सहा दिवसातील नागपूरमधील हत्येची ही चौथी घटना आहे.