COVID -19 Vaccination : नागपुरात लसीकरणाला वेग, शहरातील 98 केंद्रावर लसीकरण सुरु
आज नागपूर शहरातील 110 पैकी 98 लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. कालच राज्य सरकारने 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण तूर्तास थांबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 45 पेक्षा जास्त वयोगटासाठी आज शहरातील बहुतांशी लसीकरण केंद्रावर सकाळपासून लसीकरण केले जात आहे. काल नागपूर शहरामध्ये अवघ्या 963 जणांचा लसीकरण पार पडलं होतं तर नागपूर ग्रामीणमध्ये 8,408 लोकांचे लसीकरण पार पडलं होतं.