नागपूरमध्ये 6 जूनला 40 स्वयंसेवक बालकांवर कोवॅक्सिन लशीची चाचणी, लस घेतलेल्या मुलांची प्रकृती उत्तम

Continues below advertisement

नागपुरात कोवॅक्सिनच्या 12 ते 18 वयोगटात झालेल्या चाचणी  पहिल्या आठवड्यातील निष्कर्ष सकारात्मक आहे. 6 जून रोजी नागपूरच्या मेडीट्रीना रुग्णालयात 40 स्वयंसेवक बालकांवर कोवॅक्सिनची चाचणी करण्यात आली होती. त्यानंतरच्या 8 दिवसात कोणत्याही स्वयंसेवक मुलांवर कोणताही प्रतिकूल परिणाम दिसून आलेला नसल्याची माहिती चाचणी प्रक्रियेतील चीफ इन्वेस्टीगेटर डॉ वसंत खळतकर यांनी दिली आहे. सर्व स्वयंसेवकांचे आरोग्य उत्तम असून पुढील टप्प्याची सुरुवात उद्या पासून केली जाणार आहे. हा टप्पा 6 ते 12 वयोगटाच्या मुलांसाठी असणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram