ABP News

Congress Maharally : काँग्रेसची महारॅली, पुणे शहराचे काँग्रेसचे पदाधिकारी आकर्षक वेशभूषेत नागपुरात

Continues below advertisement

Nagpur Congress Maharally :  काँग्रेसची महारॅली, पुणे शहराचे काँग्रेसचे पदाधिकारी आकर्षक वेशभूषेत नागपुरात दाखल 

Congress Foundation Day 2023 : काँग्रेस आज (28 डिसेंबर) 139 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी नागपुरात ‘हैं तैयार हम’ (Congress 'Hain Tayyar Hum' Rally In Nagpur) महारॅलीलाा सभेला संबोधित करणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात काँग्रेस नागपुरात होणाऱ्या 'है नारायद हम' या मेगा रॅलीने करणार आहे. या रॅलीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खरगे यांच्यासह पक्षाचे सर्व बडे नेते सहभागी होणार आहेत.

आरएसएसच्या बालेकिल्ल्यात महारॅली 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय असलेल्या नागपुरात काँग्रेसच्या या मेगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप आणि आरएसएसच्या विरोधात लढण्याची चर्चा काँग्रेसने वारंवार केली आहे. 'हैं तैयार हम' असे पक्षाचे नेते सांगत आहेत. महारॅलीत लाखोंच्या संख्येने लोक आणि काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस राजकीय बिगुल वाजवेल, असे नागपूरचे आमदार नितीन राऊत यांनी सांगितले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram