Nagpur : नागपूर विधानपरिषदेत झालेल्या घोळाची काँग्रेस हायकमांडनं गंभीर दखल : Abp Majha
Continues below advertisement
नागपूर विधानपरिषदेत झालेल्या घोळाची काँग्रेस हायकमांडनं गंभीर दखल घेतलीय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि दुग्धविकासमंत्री सुनील केदार या तीन काँग्रेस नेत्यांची वरिष्ठांकडून कानउघडणी झालीय. उमेदवारीतल्या घोळावरुन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के पाटील यांच्यावरही हायकमांडची नाराजी असल्याचं कळतंय. संघाची पार्श्वभूमी असलेल्या रविंद्र उर्फ छोटू भोयर यांना तिकीट देण्यात आलं. विदर्भातल्या एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्यानं थेट सोनिया गांधींना पत्र लिहिलं. त्याच पत्राची दखल घेत काँग्रेस हायकमांडनं तीनही नेत्यांना काल जबाब विचारण्यासाठी काल दिल्लीला बोलावलं होतं.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News