Nagpur NIT Vidhansabha : नागपूर एनआयटी भूखंड प्रकरणी विधानसभेत विरोधकांचा गोंधळ

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नागपूरच्या न्यासाच्या भूखंड घोटाळ्यावरुन विरोधकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलेत.. सभागृहात विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास मंत्री असताना न्यासाची 86 कोटींची जमीन बिल्डरांना अवघ्या 2 कोटी रुपयात दिली, असा गंभीर आरोप विरोधकांनी केलाय.. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर विरोधकांनीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीवर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर विरोधक आणखी आक्रमक झाले आणि त्यांनी थेट सभात्याग केला... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola