Chandrayaan 3 : चांद्रयान-3 मोहीमेत नागपूरच्या अद्वैत दवनेचं योगदान

इस्रोची चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाली. यात नागपूरकर युवा शास्त्रज्ञ अद्वैत दवने याचंही योगदान आहे. चांद्रयान-3 मोहिमेत सेन्सर टेस्टिंगची जबाबदारी असलेल्या टीममध्ये अद्वैत दवने याच्यावर होता. सॉफ्ट लँडिंगच्या वेळेस तो मिशन ऑपरेशन कंट्रोल सेंटरमध्ये होता. लहानपणापासून शास्त्रज्ञ होण्याची इच्छा असलेल्या अद्वैतला नववीत असताना नासामध्ये स्पेस सायन्सशी संबंधित प्रकल्पासाठी निमंत्रित करण्यात आले होते. तर वयाच्या बाराव्या वर्षीच अद्वैदनं अंतराळ शास्त्रज्ञ होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पुढे एक तपानंतर तो इस्त्रोच्या टीममध्ये शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाला. अद्वैतचे वडील डॉ. प्रदीप दवने हे विभागीय फळ संशोधन केंद्रात शास्त्रज्ञ आहेत. तर आई भारती दवने शिक्षिका आहेत. अद्वैत नागपूरच्या सोमवार शाळेचा विद्यार्थी असून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये त्यानं पुढील शिक्षण घेतलं.  ऑप्टिकल इंजिनियरिंग मध्ये एम.टेक. करणारा अद्वैत कॉलेजमध्ये अव्वल राहिला होता. अद्वैतच्या चांद्रमोहीम यशाबद्दल त्याच्या आई वडिलांचा आनंद गगनात मावत नाहीए.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola