Bawankule on Thackeray : धमक असेल तर काँग्रेसची साथ सोडा, बावनकुळेंचं ठाकरेंना आव्हान
आम्ही तुमच्यासोबत आहोत पण सावरकरांचा अपमान सहन करणार नाही असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलंय.. काल उद्धव ठाकरेंनींही सावरकरांवरील टीका खपवून घेणार नाही असा इशारा दिला होता दरम्यान याच मुद्द्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधला... स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, मी त्यांचं जाहीर अभिनंदन करेन, असं बावनकुळे म्हणाले.