नितीन राऊतांमध्ये धमक नसल्याने ते वारंवार खोटं बोलतात,वीजबिल माफीवरून बावनकुळेंचा सरकारवर हल्लोबोल
राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी चार वेळेला वीजबिल माफीची घोषणा केली. पहिल्यांदा म्हणाले 100 युनिट पर्यंत माफी देऊ. नंतर म्हणाले कोरोना काळातील वीज बिल माफ करू. मग म्हणाले वीज जोडणी तोडणार नाही. राऊत यांनी अशा घोषणांवर घोषणा केल्या मात्र, तेच राऊत आता वीज बिल माफीशी केंद्र सरकारचा संबंध असल्याचे सांगत आहेत. महावितरण ही केंद्र सरकारची कंपनी आहे, की राज्य सरकारची कंपनी आहे. नितीन राऊत हे राज्याचे ऊर्जामंत्री आहे, की केंद्र सरकारचे ऊर्जामंत्री आहे असा सवाल माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला आहे.