MLC Elections : नागपूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपची खबरदारी, बंडखोरी रोखण्यासाठी नगरसेवक गोव्यात

Continues below advertisement

विधानपरिषदेची नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. नागपूर महापालिकेतील भाजप नगरसेवकांचा एक मोठा समूह गोवासाठी रवाना झाला आहे. काल रात्री उशिरा नागपूर विमानतळावरून भाजप नगरसेवक गोव्यासाठी रवाना झाले. निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये, दगा फटका होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून भाजप ने नगरसेवकांना छोट्या छोट्या समूहात विविध ठिकाणी ठेवण्याचे ठरविले असून त्याअंतर्गत पहिला समूह गोव्याला रवाना झाला आहे. काँग्रेस आमच्या लोकांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे, आमच्या लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून खबरदारी म्हणून भाजपचे नगरसेवक एकत्रित राहण्यासाठी जात असल्याची प्रतिक्रिया भाजप चे महापालिकेचे नेते अविनाश ठाकरे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजप चे चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस चे छोटू भोयर यांच्यात लढत होत असून काँग्रेस ने भाजप नगरसेवक छोटू भोयर यांना उमेदवारी देऊन आधीच भाजप ला झटका दिला आहे. पुढे निवडणुकीत छोटू भोयर किंवा काँग्रेसकडून आपले नगरसेवक फोडले जाऊ नये ही भीती भाजप ला आहे.. त्यामुळेच भाजप नगरसेवकांना विविध ठिकाणी पाठवले जात आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram