Lockdown In Nagpur | नागपुरातील लॉकडाऊनला भाजपचा विरोध
Lockdown In Nagpur : नागपुरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर नागरिाकांवर अनेक निर्बंध येणार आहेत. लॉकडाऊनबाबत नेमके काय निर्बंध लागणार यासाठी लवकरच नोटिफिकेशन येईल. त्यानंतर पोलीस सर्व नियोजन करतील, असं पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मात्र पूर्णपणे सक्तीने लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाईल. बॉर्डर्स सील केल्या जातील. अनेक जागी पोलिसांची नाकाबंदी केली जाईल. ज्या गोष्टींना बंद करण्यास सांगण्यात आलं आहे, त्या सर्व गोष्टी बंद आहे की नाही याची पाहणी आम्ही करणार आहोत, असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर येऊ नये. ज्या गोष्टींना बंद करण्यास सांगितले जाणार आहे, ते सर्व सक्तीने बंद केले जाणार आहे, असं पोलीस आयुक्तांनी म्हटलं.
Tags :
Coronavirus News Night Curfew Lockdown In Nagpur Maharashtra Lockdown News Maharashtra Covid 19 Cases Nagpur Coronavirus Lockdown Nagpur Lockdown News Nagpur Covid 19 Latest News Maharashtra Nagpur Lockdown