Nagpur Bhim Army | भीम आर्मीच्या चंद्रशेखर उर्फ रावणला नागपुरात मेळावा घेण्यास अटी शर्तींवर परवानगी
नागपुरात रेशीमबाग मैदानावर उद्या भीम आर्मीच्या चंद्रशेखर उर्फ रावणला मेळावा घेण्यास उच्च न्यायालयाने काही अटी शर्तींवर परवानगी दिलीय. रेशीमबाग मैदानाला लागूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ हेडगेवार स्मृती मंदिर परिसर आहे... आणि त्या परिसरात संघाचे कार्यालयही आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावरून पोलिसांनी मेळाव्याला परवानगी नाकारली होती.