Nagpur : भारत मुक्ती मोर्चाचं RSS विरोधात आंदोलन, पोलिसांकडून कारवाई ABP Majha
नागपुरात आरएसएसच्या मुख्यालयाला घेराव घालण्याचा इशारा देत इंदोरा चौकात जमलेल्या भारत मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई सुरु केलीय. भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम यांनी घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर पोलीस आणि न्यायालयानं परवानगी नाकारल्यानंतरही मोर्चा काढण्यासाठी शेकडो कार्यकर्ते दाखल झाले. त्यांना पोलीस ताब्यात घेतायत.....