Nagpur | बेड विथ कमोड आणि साईड टर्निंग; अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त बेड
असाध्य आजार किंवा मोठ्या अपघातानंतर अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांकरता उपयुक्त असा अत्याधुनिक बेड नागपुरातील विश्वेश्वरैया राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेच्या यांत्रिकी विभागात तयार केला आहे. 'बेड विथ कमोड आणि साईड टर्निंग' असं या आत्याधुनिक बेडचं नाव आहे. अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांच्या दृष्टीनं अतिशय फायदेशीर ठरणारा हा बेड व्हीएनआयटीचे प्राध्यापक डॉ अतुल अंधारे आणि पीएचडी करणाऱ्या अनिल ओंकार यांनी तयार केलाय. या बेडवर रुग्णांना त्यांच्या दैनंदिन क्रिया तसंच आवश्यक हालचालींचा व्यायाम करणं अतिशय सोपं होणार आहे.