Nagpur Tiger : बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयातील राजकुमार वाघाची मस्ती

Continues below advertisement

थेट लग्न मंडपात प्रवेश करून धुमाकूळ घालणाऱ्या राजकुमार वाघाचं वास्तव्य सध्या नागपूरच्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात आहे... तिथे ही या राजकुमारचं वास्तव्य अजूनही तेवढ्याच बिनधास्त आणि निर्धास्त आहे. आपल्या टेरिटोरी मध्ये कोणतीही नवी गोष्ट दिसली राजकुमार त्याची चाचपणी आणि पडताळणी करतो. अशातच  विदर्भामध्ये उष्णतेची तीव्रता सर्वाधिक असते, त्यामुळे उष्णतेच्या झळा कमी जाणवाव्यात यासाठी प्राण्यांसाठी प्राणीसंग्रहालयामध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात प्राण्यांसाठी खास मिस्ट फॉगरही  बसवण्यात आलीयेत. पण हीच सुविधा राजकुमारच्या काही पसंतीस उतरली नाही, मग काय त्यानं त्या शॉवरची पाईपलाईनच संपूर्णपणे तोडून टाकली, आणि जवळच असलेल्या पाण्याच्या डबक्यात पडून राहिला.. त्याच्या याच  मस्तीचा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झालाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram