नागपूरकरांचा उन्हाळा 'सुखद', सरासरी 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद!
मे महिन्यात नागपूरात प्रचंड तापणारे सूर्य नारायण यंदा नागपूरकरांवर चांगलेच मेहरबान आहेत. नागपुरात मे महिन्यात दिसून येणारे ४५ आणि ४६ अंश सेल्सियस असे प्रचंड तापमान यंदा बेपत्ता आहे. या वर्षी मे महिन्यात नागपूरचा उच्चांकी तापमान फक्त ४२.२ अंश सेल्सियस एवढं राहिला आहे... त्यामुळे यंदा नागपुरात मिश्कीलपणे का होईना "बच्चा गर्मी" असल्याची चर्चा आहे. दरम्यान, कमकुवत उन्हाळा कमकुवत मान्सूनचा कारण ठरेल का अशी भीती ही व्यक्त केली जात आहे...