Ashish Deshmukh : KC Venugopal यांच्यामुळेच काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर ABP Majha
महाराष्ट्रातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद सुरुच आहे... काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर आरोप करताना थेट काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वावरच निशाणा साधलाय... काँग्रेसचे केंद्रीय संघटन सचिव के.सी.वेणुगोपाल नाना पटोलेंच्या खिशात आहेत.. त्यामुळे पटोलेंना पदावरून हटवले जाणार नाहीत असा घणाघात देशमुखांनी केलाय... के.सी.वेणुगोपाल यांच्यामुळे काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला असल्याचा आरोपही देशमुखांनी केलाय...