Anil Deshmukh Bail : अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येणार, मुंबई, नागपुरात बॅनरबाजी

Continues below advertisement

Anil Deshmukh Bail :  १ वर्षे, १ महिना आणि २७ दिवस तुरुंगात घालवल्यानंतर अखेर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येणार आहेत. आणि त्यांच्या स्वागतासाठी स्वतः अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील मुंबईत दाखल होणार आहेत. अजित पवार सरकारी विमानानं मुंबईत दाखल होणार आहेत.  देशमुखांच्या जामिनावरची स्थगिती वाढवण्याची  सीबीआयची मागणी काल मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. त्यामुळे देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे..दरम्यान अनिल देशमुख तुरुंगाबाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आर्थर रोड ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत बाईक रॅली काढणार आहेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram