Agniveer Nagpur : नागपुरात मध्यरात्रीपासून अग्निवीर भरती प्रक्रिया सुरु, उमेदवारांना अनेक सुविधा उपलब्ध
नागपुरात मध्यरात्रीपासून अग्निवीर भरती प्रक्रिया सुरु झालीय. मानकापूर क्रीडा संकुलात ही भरती होतेय. विदर्भातल्या तरुणांना या भरतीमुळे सैन्यात दाखल होण्याची संधी मिळाली आहे. अग्निवीर भरतीसाठी विदर्भातील हजारो तरुण सहभागी होतील असा अंदाज असल्यानं प्रशासनानं पुरेशी तयारी करून त्यांना अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. औरंगाबादमध्ये झालेल्या भरतीच्या वेळी उमेदवारांना रस्त्यावर राहण्याची वेळ आली होती. या पार्श्वभूमीवर नागपुरात मानकापूरच्या क्रीडा संकुलात भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची थांबण्याची व्यवस्था करण्यात आलीय.