Aaditya Thackeray Nagpur दौऱ्यावर, कोळसा उद्योगामुळे होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात करणार चर्चा
राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उद्या नागपूर दौऱ्यावर येणार असून औष्णिक वीज प्रकल्प आणि कोळसा उद्योगामुळे होणाऱ्या प्रदूषण संदर्भात त्यांचा हा दौरा असणार आहे... पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संस्थेचे तज्ञ दौऱ्यात आदित्य ठाकरे यांच्यासोबत असणार आहे.... उद्या दुपारी नागपुरात दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरे उद्या संध्याकाळी पारशिवनी तालुक्यातील वराडा गावात भेट देणार आहे... वराडा गावाच्या शेजारी महामिनरल मायनींग प्रायव्हेट लिमिटेड नावाची खाजगी कोल वॉशरी आहे... कोल वॉशरी मधून उडणारी काळी धूळ परिसरातील पिकांची हानी करते. शिवाय कोल वॉशरीमधून निघणाऱ्या काळ्या रंगाच्या कोळशा मिश्रित पाण्याची योग्य विल्हेवाट न लावता तो शेतांमध्ये तसाच सोडला जातो.. ते पाणी ही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्याचा वराडा येथील शेतकऱ्यांचा आरोप आहे... वराडा गावात आदित्य ठाकरे प्रदूषण पिढीत शेतकऱ्यांची भेट घेणार आहे...