Nagpur Bridge : नागपुरात 50 लाख रुपयांचा मोबाईल वे ब्रिज आठ वर्षांपासून पडून

नागपुरात लाखो रुपयांच्या शासकीय उधळपट्टीचा एक धक्कादायक नमुना उघड झालाय. खाणीतून खनिज घेऊन जाणाऱ्या ट्रक्सचं वजन करण्यासाठी ५० लाख रुपयांचा मोबाईल वे ब्रिज आठ वर्षांपासून पडून आहे. हा मोबाईल वे ब्रिज आता भंगारात विकण्याची वेळ आलीय. 2015 मध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी 50 लाख रुपये खर्चून अद्यावत मोबाईल वे ब्रिज खरेदी करण्यात आला..  मात्र हा मोबाईल वे ब्रिज दुर्गम भागात चालवण्यासाठी कुशल ड्रायव्हरची नेमणूकच झाली नाही. त्यामुळे गेली आठ वर्ष हा मोबाईल वे ब्रिज पडून आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola