GST Scam | महाराष्ट्रात 135 कोटींचा जीएसटी घोटाळा, बनावट बिलं सादर करुन सरकारी तिजोरीला चुना
Continues below advertisement
अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या खोट्या विक्रीचे बनावट देयके सादर करून सरकारी तिजोरीला तब्बल 135 कोटींचा चुना लावल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाने म्हणजेच डिजीजीआयच्या नागपूर झोनल युनिटने हा 'जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडीत घोटाळा' उघडकीस आणला आहे. विशेष म्हणजे भंडारा पासून नंदुरबारपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात बनावट देयकांच्या आधारे खोटा व्यवहार करणारे रॅकेट सक्रिय असून घोटाळा करणाऱ्या तथाकथित 22 कंपन्यांपैकी एकाच्या म्होरक्याला नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा येथून अटक करण्यास डिजीजीआय ला यश आले आहे तर इतरांचे शोध घेतले जात आहे.
Continues below advertisement