She was raped says victim's brother | बहिणीवर बलात्कार झाला,पीडितेच्या भावाची प्रतिक्रिया #Hathras

हाथरस :  हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात एबीपी न्यूजच्या मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. ABP न्यूजच्या मोहिमेनंतर आता पीडितेच्या गावात मीडियाला प्रवेश देण्यात आला आहे. प्रवेश दिल्यानंतर सर्वात पहिल्यांदा एबीपी न्यूज टीम पीडितेच्या घरी पोहोचली. पीडितेच्या भावानं म्हटलं आहे की, आमचे फोन सर्विलांसवर आहेत. डीएमने आम्हाला धमकी दिली आहे. आम्हाला कुणाशी बोलण्यास बंदी घातली तसंच बाहेर देखील निघू दिलं नाही. पीडितेच्या परिवारानं म्हटलं आहे की, पोलिसांनी आम्हाला सांगायला हवं होतं की, त्यांनी कुणाला जाळलं. कुणाच्या सांगण्यावरुन आमच्या मुलीला जाळलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola