Yashwant Jadhav यांचे भायखळ्यातील 31 फ्लॅटस, हॉटेल आणि वांद्र्यातील 5 कोटींचा फ्लॅट जप्त ABP Majha
Continues below advertisement
मुंबई महापालिकेतील शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्याशी संबंधित ४१ मालमत्ता आयकर विभागानं जप्त केल्या आहेत. त्यात भायखळ्यातल्या बिलखाडी चेम्बर्समधील फ्लॅट्स, हॉटेल इम्पिरियल क्राऊन आणि वांद्रे इथल्या ५ कोटी रुपये किंमतीच्या एका फ्लॅटचा समावेश आहे. आयकर खात्यानं काही दिवसांपूर्वी जाधव यांच्या घरी आणि मालमत्तांवर छापे टाकले होते. या छाप्यात त्यांना मिळालेल्या माहितीनंतर आता जप्तीची कारवाई करण्यात आलीय.
Continues below advertisement