Worli Hit and Run : वरळी हिट अँड रन प्रकरणात कोण कोण दोषी ?

Continues below advertisement

Worli Hit and Run : वरळी हिट अँड रन प्रकरणात कोण कोण दोषी ?  रळी परिसरात कावेरी नाखवा या महिलेला गाडीखाली चिरडणाऱ्या मिहीर शहा याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. अपघात झाल्यानंतर मिहीर शहा फरार होता. मिहीरचे वडील राजेश शहा (Rajesh Shah) हे शिंदे गटाचे पालघर जिल्ह्यातील उपनेते आहेत. त्यांच्याच सल्ल्यानुसार अपघात झाल्यानंतर मिहीर शाह (Mihir Shah) हा वांद्रे परिसरात गाडी सोडून फरार झाला होता. राजेश शहा यांनीच मिहीरला पळून जाण्यासाठी मदत केल्याने ते पोलिसांच्या रडारवर आले होते. त्यामुळे विरोधकांकडून राजेश शहा यांच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यांची शिंदे गटातून (Shivsena Shinde Camp) हकालपट्टी होणार असल्याच्या चर्चेनेही जोर धरला होता.   मात्र, संजय शिरसाट यांनी राजेश शहा यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले. राजेश शहा यांची पक्षातून हकालपट्टी होण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा त्यांना मिळेल, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.  अशा प्रकरणांमध्ये कोणाला पाठीशी घातले जात नाही. एकदा पोलिसांकडून गुन्हा दाखल झाल्यावर संबंधित व्यक्ती कोणाचा मुलगा आहे, हे पाहिले जात नाही. मग तो मुख्यमंत्र्यांचा मुलगा असला तरी त्याला अटक केली जाते. कितीही राजकीय दबाव आला तरी एफआयआर बदलता येत नाही. हे प्रकरण हिट अॅड रनचं आहे. ज्यांना कायद्याचं ज्ञान नाही ते आपली अक्कल पाजळत आहे, असा पलटवार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram