Worli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP Majha

Continues below advertisement

Worli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP Majha

हे देखील वाचा

जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण

परभणी : आपल्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी परभणीतून मराठा (Maratha) समाजाला संबोधित केलं. परभणीत जमलेल्या तमाम बांधवांना माझा मानाचा मुजरा म्हणत मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. परभणीकरांनी दाखवलेली ताकत सरकारला दिसली पाहिजे, ही शांतता रॅली आहे, दुसरी रॅली निघाल्यावर मग बघू. महाराष्ट्रातील मराठ्यांनी कंबर कसली आहे,  ते दिवस गेलेत आता संघर्ष करायचा आहे, मराठा समाज आता पूर्ण पेटलाय. या सरकारने छगन भुजबळचे (Chhagan Bhujbal) ऐकून मराठ्यांचं वाटोळं केलंय. मराठ्यांनो एक इंचही मागे हटायचे नाही. सरकारने आणि छगन भुजबळने ओबीसींचे नेते आपल्या विरोधात लढायला लावले आहेत, असे जरांगे यांनी म्हटले. जरांगेंनी आपल्या भाषणातून सरकारला इशारा देत फडणवीसांनाही प्रश्न विचारले. तर, मुंबईतून परत आलो ही चूक झाल्याचंही म्हटलं. 

ते आरक्षण असून असे करत आहेत, मग मराठ्यांना आरक्षण नाही मग आम्ही तर काय करायला पाहिजे. तुमचं असून तुम्हाला एवढं करायचंय, आमच्या लेकरांचे तर वाटोळं झालंय. सरकारला परभणीतील नगरीतून सांगतोय, आमचा अंत पाहू नका. एकदा दोरी सुटली तर मग अवघड होईल, मराठा अन् कुणबी एकच आहे ही पहिली मागणी आहे. मराठ्यांच्या मतांचा कचका कसाय हे त्यांना कळलंय, त्यामुळे ते आता नादी लागणार नाहीत, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला सरसकट ओबीसी आरक्षणावरुन इशारा दिलाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram