Worli Costal Road : मुंबई महापालिकेचा ड्रिम प्रोजक्ट असलेल्या कोस्टल रोडचा अतिशय महत्त्वाचा टप्पा

Continues below advertisement

मुंबई महापालिकेचा ड्रिम प्रोजक्ट असलेल्या कोस्टल रोडचा अतिशय महत्त्वाचा टप्पा सध्या सुरू आहे. या कोस्टल रोडला सी-लिंकशी जोडण्याचं काम सध्या दिवसरात्र सुरू आहे. याचाच महत्त्वाचा भाग असलेला
२ हजार टनांचा गर्डर बसवण्याचं काम पूर्ण झालं आहे. दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हा गर्डर बसवण्यात आला आहे. सी-लिंककडे जाणाऱ्या मार्गिकेवरही लवकरच असाच गर्डर बसवण्यात येणार आहे. आज बसवलेल्या गर्डरला जपानी तंत्रज्ञानानं कोटिंग करण्यात आलं आहे. त्यामुळे पुढती २५ ते ३० वर्षं त्याला गंज लागणार नाही, तसंच पुढचे १०० वर्षं टिकेल इतका मजबूत हा गर्डर बनवण्यात आला आहे. पूर्व मुंबईच्या किनारी असलेल्या माझगाव डॉकवर हा गर्डर बनवण्यात आला, आणि तिथून अतिशय काळजीपूर्वक एका बार्जवर ठेवून तो वरळीपर्यंत आणण्यात आला.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram