Womens Day Special | स्त्री सुरक्षा आणि नारी सन्मानासाठी मुंबईतल्या नरीमन पॉईंटवर परेड
महिला दिनानिमित्त स्त्री सुरक्षा आणि नारी सन्मानासाठी मुंबईतल्या नरीमन पॉईंटमध्ये परेड काढण्यात आली. या परेडमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग होता.
नुकतंच पोलिस दलात दाखल झालेल्या अश्वदलानंही परेडचं लक्ष वेधलं.
महिला सुरक्षेसाठी राज्य सरकार कायदा आणणार असून त्यासाठी जनतेच्या सूचना असतील, तर त्यांनी द्याव्यात, असं आवाहनही गृहमंत्र्यांनी केलं.
नुकतंच पोलिस दलात दाखल झालेल्या अश्वदलानंही परेडचं लक्ष वेधलं.
महिला सुरक्षेसाठी राज्य सरकार कायदा आणणार असून त्यासाठी जनतेच्या सूचना असतील, तर त्यांनी द्याव्यात, असं आवाहनही गृहमंत्र्यांनी केलं.