Mumbai Local | सात महिन्यांनी महिलांचा रेल्वे प्रवास, लोकलमधून प्रवासाची परवानगी मिळाल्याचा आनंद
सर्व महिलांना लोकलमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. रेल्वे आणि राज्य सरकारच्या नाराजी नाट्यानंतर रेल्वेने मुभा दिली आहे. मुंबई लोकलमधून क्यूआर कोडशिवाय महिला प्रवाशांना प्रवास करण्याची रेल्वेनी परवानगी दिली आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आणि सायंकाळी 7 नंतर महिलांना प्रवास करता येणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्वीट करत या विषयी माहिती दिली आहे.