Anil Parab on ST Strike : कामावर येणाऱ्या कामगारांना संरक्षण देणार : अनिल परब
Anil Parab on St Workers Strike : संपातून कामावर परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची अडवणूक केल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीबाबत उच्च न्यायलयाची समिती जो निर्णय देईल त्यानुसार निर्णय घेण्यात येणार असल्याचे अनिल परब यांनी स्पष्ट केले. एसटी कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले.