Anil Deshmukh Arrested : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन की यंदाची दिवाळी तुरूंगात जाणार ?

Continues below advertisement

Anil Deshmukh Arrested : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (ANIL DESHMUKH) यांना ईडीनं अटक केली आहे. कथित 100 कोटींच्या वसुली प्रकरणात तब्बल 13 तास चौकशी केल्यानंतर ईडीनं अनिल देशमुख यांना अटक केली. आज सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. जवळपास दोन महिने नॉट रिचेबल असलेले अनिल देशमुख काल स्वतःहून ईडी कार्यालयात दाखल झाले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप लावले होते. त्या प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी देशमुखांची तेरा तास चौकशी केली. त्यानंतर रात्री दीड वाजता त्यांना अटक करण्यात आली. महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटका मानला जातोय. अशातच आता अनिल देशमुखांनंतर अनिल परब यांचा नंबर, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्यांनी केल्यामुळं महाविकास आघाडीच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram