Happy Hypoxia : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हॅपी हायपोक्झियाचे रुग्ण वाढले, काय आहे हा आजार?
हॅपी हायपोक्झिया आजार झाल्यास कोरोना रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याची कोणतीच लक्षणं दिसत नाहीत. रुग्णालाही याबाबत माहिती नसते आणि डॉक्टरांनाही खोलवर तपासणी केल्याशिवाय समजत नाही. ज्याला हॅपी हायपोक्सिया किंवा सायलेंट हायपोक्सिया म्हणतात. हॅपी हायपोक्झियाच्या वर्गात मोडणारा पेशंट वेळीच लक्षात आला नाही तर त्यामुळे कोरोना रुग्णांचा मृत्यूही होतो.