Dnyandeo Wankhede : ज्ञानदेव वानखेडे यांच्या मानहानीचा दाव्या बद्दल काय दिला उच्च न्यायालयाने आदेश ?

नवाब मलिक यांच्या आरोपांच्या समीर वानखेडे यांच्या वडिलांनी म्हणजेच ज्ञानदेव वानखेडे यानी कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला आहे. आज या प्रकरणातील पुढील सुनावणी झाली. यावेळी कोर्टानं दोघांनाही अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मलिक हे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी केलेले आरोप खोटे आहेत हे सिद्ध करणारी कागदपत्र सादर करा असे आदेश ज्ञानदेव वानखेडे यांना कोर्टानं दिले आहेत तर मलिकांनी केलेले आरोप खरे आहेत हे सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणातील पुढील सुनावणी येत्या शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola