Heart Attack Reasons तरुण वयात हृदयविकाराचा झटका कशामुळे? सिद्धार्थच्या मृत्यूचे कारण काय? ABP Majha

मुंबई : बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदनानंतर ते स्पष्ट होईल. पण त्याचे अकाली निधन म्हणजे आत्महत्या आहे का, किंवा कोणी त्याचा खून केला का अशी चर्चा आता रंगली आहे. पण या चर्चांना पूर्णविराम देताना, आपल्याला कोणावरही संशय नसल्याचं सिद्धार्थच्या कुटुंबियांनी स्पष्ट केलंय. 

पोलिसांच्या सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, सिद्धार्थच्या कुटुंबियांनी त्याच्या मृत्यूबद्दल अद्याप कोणावरही संशय व्यक्त केला नाही. त्यामुळे शवविच्छेदनानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. सिद्धार्थच्या मृतदेहाचे कूपर हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन होणार आहे. 

कूपर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सकाळी 10.30 वाजता सिद्धार्थला 'डेथ बिफ़ोर अरायव्हल' घोषित केलं होतं.  त्याचवेळी ओशिविरा पोलिसांचं एक पथक सिद्धार्थ शुक्लाच्या घरी तपासासाठी पोहोचलं होतं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola