Mumbai Local Update : मुंबईत पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत ABP Majha

Continues below advertisement

Mumbai Local Update : मुंबईत पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशीच मुंबईकरांना मनस्थाप सहन करावा लागत आहे. ओव्हरहेड वायर तुटल्यानं पश्चिम रेल्वेचा खोळंबा झाल्याची माहिती मिळत आहे. पश्चिम रेल्वेच्या दहिसर ते बोरीवली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली आहे. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या जलद मार्गावरील लोकलवर परिणाम झाला आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम सुरु करण्यात आलं आहे. काही वेळातच लोकल सेवा सुरळीत होईल अशी माहिती, पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram