WEB EXCLUSIVE | सर्वात शक्तिशाली इंजिन मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल,काय आहेत या इंजिनाची वैशिष्ट्ये?
मध्य रेल्वेच्या ताफ्यात भारतीय रेल्वेकडे असलेल्या इंजिनांपैकी सर्वाधिक शक्तिमान इंजिनाची भर पडली आहे. काही दिवसांपूर्वीच डब्ल्यू ए जी 12 बी या शक्तीशाली इंजिनाला मध्य रेल्वेकडे सुपूर्द करण्यात आले. याची ताकद 12 हजार हॉर्स पॉवर इतकी आहे. या इंजिनाच्या निर्मितीमुळे भारत जगातील सर्वाधिक शक्तिशाली इंजिन असलेल्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. केवळ मालगाड्यांच्या वाहतुकीसाठी याचा उपयोग होणार आहे.