Mumbai : मुंबईत होतीये पाण्याची चोरी? बेकायदा पाणी उपशाची होणार चौकशी; ABP Majha

Continues below advertisement

मुंबईत तीन हजार कोटींच्या पाण्याची लूट होत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केलाय. मुंबईतील या बेकायदा पाणी उपशाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी शेलार यांनी केलीय. मुंबईत 19 हजारांपेक्षा अधिक विहिरी असून त्यात साडेबारा हजार बोअरवेल आहेत. 216 अवैध जलविहिरींपैकी एकाच जलकुंभातून 80 कोटी रुपयांची पाणीचोरी झाल्याची बाब समोर आल्याचं शेलार यांनी म्हटलंय. मुंबईत नियमांची अंमलबजावणी होत नसल्यानं टँकर माफियांचं फावलंय आणि त्यातून तीन हजार रुपयांपेक्षा अधिक पाण्याची लूट होत असल्याचा आरोप शेलार यांनी केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram