Mumbai Rains | मुंबईत मुसळधार पावसामुळे किंग सर्कल परिसरात 2 ते 3 फूट पाणी साचलं
Continues below advertisement
मुंबई शहर आणि उपनगरात आजही मुसळधार पाऊस सुरुच आहे. हवामान विभागाने मुंबई परिसरात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला आहे. कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचलं आहे.
हिंदमाता, दादर टीटी, शक्कर पंचायत, एसआयईएस महाविद्यालय, गोयल देऊळ, भेंडी बाजार जंक्शन, ठाकुरद्वार नाका, षण्मुखानंद हॉल, शेख मिस्त्री दरगाह मार्ग, पोस्टल कॉलनी इथे पाणी साचलं आहे. याशिवाय उपनगरातील अंधेरी सब वे, भांडुप इथेही नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे.
Continues below advertisement
Tags :
Kings Circle Maharashtra Monsoons Red Alert In Mumbai Monsoon Updates Sion Water Logging Mumbai Rains Monsoon 2020 Mumbai