Shivsena | उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्याला शिवसैनिकांकडून चोप | ABP Majha
शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरें विरोधात फेसबूकरवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला शिवसैनिकांनी चोप दिलाय. एवढचं नाहीतर भर चौकात त्याचे केस कापून टक्कल करण्यात आलं. मुंबईतील वडाळ्यात ही संतापजनक घटना घडली आहे. दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर 15 डिसेंबर रोजी जामिया मिलिया इस्लामियातील विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. या घटनेचा निषेध देशभरातील विविध ठिकाणांहून करण्यात येत आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाविरोधात वडाळात राहणाऱ्या हिरामणी तिवारी या व्यक्तीनं फेसबूक पोस्ट टाकली होती. मात्र त्याला विरोध करताना शिवसैनिकांनी मात्र कायदाच हातात घेतला.