Virar ICICI Robbery: विरारच्या ICICI बॅंकेवर दरोडा टाकणाऱ्या आरोपीचा यापूर्वी Axis बॅंकवर डल्ला

विरारमध्ये बॅंकेच्या पूर्व मॅनेजरने बॅंकेतील कर्मचारीवर चाकूने हल्ला करत बॅंकेतील एक कोटी अडतीस लाखांची रोख आणि सोन घेऊन, फरार होत असताना नागरिकांच्या सतर्कतेने आरोपीला पकडण्यात यश आलं आहे.  विरार पूर्व स्टेशन परिसरातील  ICICI बँकेत गुरुवारी रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली आहे. बॅंक लुटणारा दुसरा तिसरा कुणी नसून, बॅंकेचा पूर्वीचा मॅनेजर होता. या हल्ल्यात बॅंकेच्या असिस्टंट मॅनेजर महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एकीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेच्या वेळी बॅंकेचा सुरक्षारक्षक नसल्याने बॅंकेच्या कार्यप्रणालीवर महिलांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola