Virar Fire | रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार- जितेंद्र आव्हाड

विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात भीषण आग लागली असून यामध्ये तब्बल 14 रुग्णांचा मृत्यू झालाय. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 14 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर अनेक मंत्री आणि नेत्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola