Vinayak Raut : शिवाजी पार्कसाठी केलेल्या अर्जात फेरफार, शिंदे गटावर विनायक राऊतांचा गंभीर आरोप
Vinayak Raut : शिवाजी पार्कसाठी केलेल्या अर्जात फेरफार, शिंदे गटावर विनायक राऊतांचा गंभीर आरोप
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. शिवाजी पार्कसाठी शिंदे गटानं जो अर्ज केला होता, त्यावर आधीची तारीख टाकली होती, जेणेकरून ठाकरे गटाच्या आधी अर्ज केला असं दाखवता येईल, मात्र माहितीच्या अधिकाराअंतर्गत प्राप्त झालेल्या माहितीमुळे शिंदे गटाचा बनाव उघडा पडला, असा दावा विनायक राऊतांनी केला आहे.