Vikroli Medical Camp I दोन महिन्यांत दहा हजारांपेक्षा जास्त रुग्णांना मोफत रुग्णसेवा देणारा डॉक्टर

Continues below advertisement
कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. वाढणारा हा आकडा नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे.
या आरोग्य प्रशासनाला मदत करण्यासाठी खाजगी दवाखान्यातील डॉक्टर देखील समोर आले आहेत.विक्रोळीच्या टागोरनगर विभागात राहणारे डॉ. योगेश भालेराव यांनी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मुंबईतील विविध भागात खासकरून झोपडपट्टी आणि चाळीत मेडिकल कँप सुरू केले आहेत. मागील दोन महिन्यांत आत्तापर्यंत डॉ. योगेश भालेराव यांनी 10 हजारांपेक्षा देखील जास्त रुग्ण तपासले आहेत. विशेष म्हणजे यासाठी डॉ. भालेराव कोणतही शुल्क आकारात नाहीत. सध्या झोपडपट्टी आणि चाळीत पॉझिटिव्ह रुग्णांसोबत इतर आजारांनी त्रस्त रुग्ण आहेत. अशा रुग्णांवर मोफत उपचार करून गोळ्या औषधे देखील देण्यात येतं आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram