Varsova Bridge : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा पूल वाहतुकीसाठी खुला
Continues below advertisement
घोडबंदर येथील वर्सोवा खाडीवर बांधण्यात आलेल्या नव्या वर्सोवा पुलाची मुंबई आणि ठाण्यावरून सुरतच्या दिशेने जाणारी एक मार्गिका सुरू करण्यात आलीये. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात ट्वीट करून पुल सुरू करणार असल्याचे संकेत दिल्यानंतर अवघ्या ३ तासांत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. यामुळे जुन्या वर्सोवा पुलाच्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Continues below advertisement