Vasai - Virar Fire : वसई-विरारमध्ये अग्नितांडव, फटाक्यांमुळे इतरांचं दिवाळं नको : ABP Majha
Continues below advertisement
देशासह राज्यभरात दिवाळी (Diwali 2022) उत्साहात साजरी केली जात आहे. तब्बल दोन वर्षांनी देशात निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत आहे. अशातच वसईत (Vasai News) मात्र दिवाळीच्या उत्साहात विरझण पडलं आहे. वसईत काल सोमवारी तब्बल सहा ठिकाणी (Vasai Fire News) आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. काल दिवसभरात वसई, विरार आणि नायगावमध्ये आगीच्या सहा घटना घडल्या आहेत. घरातील ए.सी. जळल्यानं एका बंगल्याचं नुकसान झालं तर फटाक्यामुळे पाच ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यात सुदैवानं कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
Continues below advertisement