Vasai Bhiwandi रस्त्याची दुर्दशा, चांगला रस्ता दाखवा एक लाख घेवून जा...स्थानिक नागरीकांच आवाहन
वसईतील चिंचोटी भिंवडी रोड ची अक्षरशः चाळण झालेली आहे. चिंचोटी कांजूरफाटा ते मानकोली असा हा २५ किमीचा राज्य महामार्ग आहे. माञ या रस्त्यावर खड्डयाचं साम्राज्य बनलं आहे. स्थानिकांनी दोन वेळा आंदोलन केलं. तरीही रस्त्यावरील खड्डे बुझवले गेले नाहीत. आता तर स्थानिकांनी अधिका-यांना खुलं चॅलेंज केलं आहे. सुंदर रस्ता दाखवा आणि एक लाख रुपये घेवून जा.