Vande Bharat Express ची मुंबई ते इगतपुरी ट्रायल, 10 तारखेला सीएसएमटीवरुन मोदींच्या हस्ते उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रिम प्रोजेक्ट असलेली वंदे भारत एक्स्प्रेसची मुंबई ते इगतपुरी अशी ट्रायल घेण्यात आली. मुंबई ते शिर्डी १० तारखेपासून रेल्वेसेवा सुरु करण्यात येणार आहे. मुंबई ते इगतपुरी हा घाट रस्ता असल्याने या भागातून रेल्वे जाताना कोणत्या अडचणी तर येत नाही ना यावर देखील भर दिला जातोय. १० तारखेला सीएसएमटीवरुन मोदींच्या हस्ते या वंदे भारतचं उद्घाटन करण्यात येणार आहे.