Governor Appointed MLA|Urmila Matondkar| काँग्रेसकडून उर्मिला मातोंडकर यांची विधानपरिषदेवर नियुक्ती?
कोरोना संकटाच्या काळात पुढे ढकलल्या गेलेल्या 12 राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या प्रस्तावाला बुधवारचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. उद्या (बुधवारी) होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत 12 राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 जागांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडी सरकारच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. मागच्या कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव येणार अशी चर्चा सुरु होती. पण काही कारणास्तव हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला होता.