Mumbai ATS ने ताब्यात घेतलेल्या संशयित दहशतवाद्यांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन,जाकीर कुणाचे आदेश मानत होता?
Continues below advertisement
मुंबई : दिल्लीतून सहा दहशतवाद्यांना अटक केल्यापासून देशातील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्रिय झाल्या आहेत. काल रात्री मुंबई एटीएसने कारवाई करत या लिंकशी संबंधित आणखी एका दहशतवाद्याला अटक केली आहे. जाकीर हुसेन शेख असं या दहशतवाद्याचं नाव असून तो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित आहे. जाकीर हुसेन शेखने दिल्लीत अटक करण्यात आलेल्या मुंबईच्या जान मोहम्मदला हत्यार आणि विस्फोटांची डिलिव्हरी घेण्यास सांगितलं होतं.
जाकीर हुसेनची शेख अटक ही एटीएसची महत्वपूर्ण कारवाई समजली जाते. कारण दिल्लीत अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांच्या योजनेबद्दल त्याच्याकडे महत्वपूर्ण माहिती असल्याचं सांगण्यात येतंय. जाकीरने नेमकं कोणाच्या आदेशावरून जान मोहम्मदला हत्यार आणि विस्फोटांची डिलिव्हरी करण्यास सांगितलं होतं याचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement