Uddhav Thackeray vs Eknath Shinde:शिवसेनेतील बंडाच्या वर्षपूर्तीनिमित्त स्वाभिमान विरुद्ध गद्दार दिन

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेत झालेल्या बंडाला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त शिंदेच्या शिवसेनेच्या वतीनं हा दिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे. पण शिवसेनेतल्या ठाकरे गटाच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शिंदे आणि त्यांच्या समर्थकांचा मंगळवारी निषेध करण्यात येणार आहे. या दिवशी ठाकरे गटाच्या वतीनं  खोके दिन, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं गद्दार दिन पाळण्यात येणार आहे. आमदार आदित्य ठाकरेंनी २० जून रोजी जागतिक गद्दार दिन साजरा करण्याच्या केलेल्या सूचनेचं कौतुक होत असल्याची खोचक प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी व्यक्त केली आहे. वीस जूनला जागतिक गद्दार दिन साजरा करण्याबाबत आपण संयुक्त राष्ट्रसंघाला पत्र देऊ, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तर माजी राज्यपाल भगतसिंह  कोश्यारी यांना पत्र लिहून २१ जून हा दिवस जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करावा, अशी युनोकडे विनंती करावी असं पत्र दिलं आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola